स्रोत कोड

जर तुम्हाला वर्डप्रेस स्रोत आणि इनलाइन डॉक्युमेन्टेशन ब्राउझ करायचे असेल, तर येथे एक सुविधाजनक विकासक संदर्भ आणि एक कोड ब्राउझर आहे. तुम्ही सबव्हर्जनसह योगदान देण्यासाठी आणि गिटसह योगदान देण्यासाठी मार्गदर्शक देखील शोधू शकता.

बिल्ट वर्डप्रेस स्रोत, परवानाधारित GNU सामान्य सार्वजनिक परवाना आवृत्ती 2 (किंवा नंतरच्या) अंतर्गत, ऑनलाइन ब्राउझ केला जाऊ शकतो किंवा स्थानिकरित्या Subversion किंवा Git सह तपासला जाऊ शकतो:

  • सबव्हर्जन: https://core.svn.wordpress.org/
  • गिट मिरर: git://core.git.wordpress.org/

वर्डप्रेस मुख्य JavaScript फाईल्स UglifyJS वापरून आणि CSS clean-css वापरून कमी करते, सर्व Grunt JavaScript-आधारित कार्य चालवणाऱ्याद्वारे. या फाईल्सच्या अन-कमी केलेल्या आवृत्त्या आणि बिल स्क्रिप्ट्स समाविष्ट असलेला विकास स्रोत ऑनलाइन ब्राउझ केला जाऊ शकतो किंवा Subversion किंवा Git सह स्थानिकरित्या तपासला जाऊ शकतो:

  • सबव्हर्जन: https://develop.svn.wordpress.org/
  • गिट मिरर: git://develop.git.wordpress.org/

वर्डप्रेससह समाविष्ट असलेल्या कोणत्याही प्रोग्राम बायनरी किंवा मिनिफाइड बाह्य स्क्रिप्टसाठीचा स्रोत कोड आमच्या स्रोत संग्रहालय वरून मोफत मिळवता येतो.