आशयावर जा
  • होम
    • खाजगीरीत्या मेसेज करासंपर्कात रहाग्रुप्समध्‍ये कनेक्ट करास्वतःला व्यक्त कराडिझाइनद्वारे सुरक्षिततुमच्या दररोजच्या घटना शेअर कराचॅनल फॉलो करा Meta AI सह बरेच काही करा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • डाउनलोड करा
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2025 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • खाजगीरीत्या मेसेज करा

      एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन आणि गोपनीयता नियंत्रणे.

    • संपर्कात रहा

      जगभरात विनामूल्य* मेसेज आणि कॉल करा.

    • ग्रुप्समध्‍ये कनेक्ट करा

      ग्रुप मेसेजिंग सोपे झाले आहे.

    • स्वतःला व्यक्त करा

      स्टिकर, व्हॉइस, GIF आणि बर्‍याच गोष्टींद्वारे सांगा.

    • डिझाइनद्वारे सुरक्षित

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

    • तुमच्या दररोजच्या घटना शेअर करा

      स्टेटस वर फोटो, व्हिडिओ, व्हॉईस नोट शेअर करा.

    • चॅनल फॉलो करा

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI
      सह बरेच काही करा

      कशाहीबाबत मदत मिळवा.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा
ब्लॉगकडे परत
WhatsApp ब्लॉग

दोन अब्ज वापरकर्ते -- खाजगीपणा जपून जगभरात एकमेकांशी कनेक्ट करते

आम्हाला हे शेअर करण्यात आनंद होत आहे की, आजपर्यंत WhatsApp जगभरातील दोन दशलक्ष वापरकर्त्यांपेक्षा अधिक लोकांना सपोर्ट करते.

वडीलधारी माणसं त्यांच्या जिवलगांच्या ते जगाच्या पाठीवर कोठेही असले तरीही अगदी सहज संपर्कात येऊ शकतात. बहीण भावंडं एकमेकांशी मौल्यवान क्षण शेअर करू शकतात. सहकर्मचारी एकमेकांशी सहयोग वाढवू शकतात आणि ग्राहकांशी सहज कनेक्ट होऊन बिझनेस वृद्धिंगत करू शकतात.

खाजगी संभाषणे, जी पूर्वी केवळ समोरासमोरच करणे शक्य असायचे ती आता त्वरित चॅट्स आणि व्हिडिओ कॉलिंग द्वारे करता येतात. WhatsApp च्या या वाटचालीमध्ये अनेक महत्त्वाचे आणि मौलिक क्षण येऊन गेले आहेत. आम्ही एवढी मोठी मजल मारू शकलो याबद्दल आम्ही ऋणी असून हा आम्हाला आमचा सन्मान वाटतो.

आम्हाला कल्पना आहे की, जेवढे अधिक लोक कनेक्ट होतील तेवढीच सुरक्षा देखील आम्हाला वाढवावी लागेल. आजकाल आपला ऑनलाईन वावर बराच वाढला असल्याने आपली संभाषणे सुरक्षित ठेवणे अधिकाधिक महत्त्वपूर्ण होत आहे.

त्यामुळेच WhatsApp वापरून पाठवलेला प्रत्येक खाजगी मेसेज डिफॉल्टनुसार एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेला आहे. सशक्त एन्क्रिप्शन हे एका अभेद्य डिजिटल लॉक प्रमाणे कार्य करते जे तुम्ही WhatsApp वर पाठवत असलेली माहिती सुरक्षित ठेवते आणि तुम्हाला हॅकर्स आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देते. मेसेज हे तुमच्या फोनवरच ठेवले जातात आणि कोणीही ते वाचू शकत नाहीत किंवा तुमचे कॉल्स ऐकू शकत नाहीत, अगदी आम्हीदेखील नाही. तुमची खाजगी संभाषणे तुमच्यामध्येच राहतात.

या आधुनिक काळामध्ये सशक्त एन्क्रिप्शन असणे अतिशय गरजेचे आहे. आम्ही सुरक्षेमध्ये कधीही तडजोड करणार नाही कारण तसे केल्यास लोकांची सुरक्षितता कमी होऊ शकते. अधिक सुरक्षेसाठी आम्ही उच्च सुरक्षा तज्ञांबरोबर काम करतो आणि इंडस्ट्रीमधील अग्रेसर टेक्नॉलॉजीचा वापर करून गैरवापर होणे थांबवितो तसेच, ते नियंत्रित करण्यासाठी व तक्रार नोंदवण्यासाठी गोपनीयतेशी तडजोड न करता विविध साधने प्रदान करतो.

लोकांना सोपी, सुरक्षित आणि खाजगी सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशानेच WhatsApp ची सुरुवात झाली होती. सुरुवातीला आम्ही जसे होतो तसेच आजही, जगभरातील लोकांना खाजगीरित्या कनेक्ट होण्यास मदत करण्यासाठी आणि जगभरातील दोन अब्ज लोकांची वैयक्तिक संभाषणे सुरक्षित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

१२ फेब्रुवारी, २०२०

डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा
आम्ही काय करतो
फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी
आम्ही कोण आहोत
आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता
WhatsApp वापरा
AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब
मदतीची गरज आहे?
आम्हाला संपर्क करामदत केंद्रअ‍ॅप्ससुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2025 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप